HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपकडून अखेर माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधील बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. भाजपकडून माढ्यातून अखेर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आपली १२ वी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र्र या राज्यांतील एकूण ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गेले अनेक दिवस माढा मतदारसंघासाठी भाजप कोणता उमेदवार देणार यावर उलट सुलट चर्चा होत होत्या.

माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रथम माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते राज्यात राहण्यास इच्छुक असल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपकडून माढ्याची उमेदवारी त्यांनाच मिळणार असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, त्यांचे नाव मागे पडत विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुढे येऊ लागले होते. मात्र, आता अखेर भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

जर भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीला राम राम करत माढ्यातून लढण्याची तयारी काहीच दिवसांपूर्वी काहीच दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी दाखवली होती. त्याचप्रमाणे, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजयसिंह हे देखील मनाने भाजपमध्येच आहेत’ असे सूचक वक्तव्य देखील केले होते.

Related posts

न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे !

ममता बॅनर्जी झाशीची राणी नाही तर पुतना मावशी !

News Desk

सुजय विखे पाटील शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

News Desk