HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

बलात्कारी राज बल्लभ निर्दोष, शिक्षा हा यादवांचा अपमान, राबडी देवींचे अजब वक्तव्य

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या धामधुमिला सुरुवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारसाठी जावून त्यांच्या प्रचार करत आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राज बल्लभ याला सरकारने बलात्कार प्रकरणात फसवून त्यांना तुरुंगात टाकले आहे. ऐवढेच नव्हेत तर असे करून यादवाना बदनाम करण्याच कट असल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला आहे.

आरजेडीने राज बल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. विभा देवी यांच्या प्रचारादरम्यान राबडी देवी यांनी राज बल्लभ निर्दोष असल्याचे सांगत त्यांना सरकारने बलात्कार प्रकरणात गोविण्यात आल्याचे प्रयत्न केला आहे. राज बल्लभ यांना न्यायालयाने दोषी ठरविले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले आहे. तसेच राज बल्लभला झालेली शिक्षा हा यादव वंशाचा अपमान असल्याचे राबडी यांनी जाहीर सभेत म्हटले आहे. राबडी यांच्या वादग्रस्त विधानवर जेडीयू आणि भाजपने आक्षेप घेतला आहे.

 

 

Related posts

‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे !

News Desk

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

Ramdas Pandewad

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk