HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

मुंबई | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) महाविकासआघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे. गेल्या 28 वर्षात कसबा भाजपच्या बाल्लेकिल्यात काबीज करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 72 हजार 599 मते मिळाली आहे. आता चिंचवड पोटनिवडणुकीचा निकालाकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.

 

दरम्यान, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 62 हजार 771 मतदानी पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजयी झाला. कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. परंतु, या पोटनिवडणुकीत भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंब्यांना उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली. भाजपच्या निर्णयाने कसब्यातील नागरिक नाराज झाल्याचे निकालातून दिसून आले. कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यापासून नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यात 28 वर्षांनंतर कसब्यामध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. यापूर्वी 1992 मध्ये कसब्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. तर 2009 मध्ये भाजपचे नेते गिरीश बाजप यांच्याविरोधात रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढविली होती. परंतु, रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रवींद्र धंगेकर यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक ही मनसेकडून लढविली होती. या निवडणुकीत गिरीश बापट 7 हजार मतांनी विजय मिळाला होता.  2014 मध्ये रवींद्र धंगेकरांनी कसबा पेठेतून निवडणूक लढविली होती. परंतु, तेव्हा ही त्यांचा पराभव झाला होता. यानंतर रवींद्र धंगेकर यांनी 2017 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर कांग्रेसने रवींद्र धंगेकरांना 2019 निवडणुकीत तिकीट देण्याऐवजी अरविंद शिंदे यांनी दिले होते.

 

Related posts

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य! सामनातून भाजपवर निशाणा

News Desk

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

Aprna

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार | उद्धव ठाकरे

News Desk