नवी दिल्ली | आम आदमी पार्टीतील आमदार देवेंद्र सहरावत यांनी आज (६ मे) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सहरावत यांच्या भाजप प्रवेशाने आपला मोठा धक्का बसला आहे. आप’मध्ये चांगल्या कामाची कदर नसल्याने पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सहरावत यांनी सांगितले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार देवेंद्र सहरावत यांनी यापूर्वीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.
Delhi: Rebel AAP MLA Devinder Kumar Sehrawat joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of Union Minister Vijay Goel. pic.twitter.com/DD5P3rVYLJ
— ANI (@ANI) May 6, 2019
देवेंद्र सहरावत यांच्यासह अन्य काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. याआधी आप नेते मनीष सिसोदिया यांनी भाजप आमच्या ७ आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना भाजप नेते विजय गोयल यांनी आपचे ७ नाही तर १४ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा टोला लगावला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.