HW Marathi
राजकारण

#Results2018 : पाचही राज्यांमध्ये विधानसभांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (११ डिसेंबर) जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार असून या राज्यांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यांत अनुक्रमे १२ आणि २० नोव्हेंबरला, मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला, मिझोरममध्ये २८ नोव्हेंबरला तर तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पाच राज्यांच्या निकालांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता कायम टिकवणे हे आता भाजप समोरचे मोठे आव्हान आहे. परंतु, विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल्सनुसार मध्य प्रदेशासह राजस्थानमध्ये देखील जन्मताच कौल काँग्रेसच्या बाजूने अधिक झुकल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपला जर या विधानसभा निवडणुकांमध्ये अपयश आले तर त्याचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळेच, या राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपपैकी नेमके कोण किंगमेकर ठरणार हे पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Related posts

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

News Desk

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला ट्विटरवर #GoBackModi द्वारे जोरदार विरोध

News Desk

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk