HW News Marathi
राजकारण

स्मारकांसाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत करा, मायावतींना न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना स्मारक आणि मूर्ती उभारण्यासाठी खर्च करण्यात आलेले पैसे परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांना दिले आहेत. या प्रकरणी २००९ साली याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणावर जवळपास १० वर्षांनी सुनावणी झाली असून या आदेशामुळे मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

‘बसप अध्यक्षांनी पुतळे उभारण्यासाठी वापरलेला सामान्य जनतेचा पैसा परत करावा,’ असे सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट सांगितले आहे. मायावती मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक ठिकाणी हत्तींचे पुतळे उभारले होते. त्याचप्रमाणे मायावतींनी स्वत:चेही अनेक पुतळे तसेच काही उद्यानेदेखील उभारली ज्या त्यांचे आणि हत्तींचे पुतळे उभे केले. काशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे त्यांनी उभारले होते.

मायावतींनी या प्रकरणीची सुनावणी मे महिन्यानंतर घेण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य करत पुढील सुनावणी २ एप्रिलला होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk

शहीद कर्नल महाडिक यांच्या वर्गमित्रांची सैन्याला अनोखी दिवाळी भेट

Gauri Tilekar

खंडाळ्याच्या शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

News Desk