मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करणे भाग आहे, अशी टीप्पणी देखील न्यायालयाने म्हटले आहे
पालिकेकडे विशेषाधिकार आहे. तरी देखील हे प्रकरण आमच्याकडे येता कामा नये, न्यायालयाकडे हे प्रकरण आल्यानंतर हस्तक्षेप करणे भाग आहे, असे म्हणत न्यायालयाने पालिकेला खडेबोल सुनावले. न्यायालयात पालिकेच्या वतीने युक्तीवात करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे म्हटले, “राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला नाही. कारण हा आधिकार नोकरी देणाऱ्याला असतो. यासारख्या प्रकरणात न्यायालयालही आदेश देण्याचा अधिकार नसतो. कर्मचाऱ्याचा नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नामंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे”, असे ते म्हटले.
न्यायालयाने पालिकेला खडेबोल सुनावले
“सर्व सामान्य कर्मचाऱ्याला राजीनाम्या एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवयाची आहे. तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हावा, हे प्रकरण येथेपर्यंत यायलाच नको होता”, असे म्हणत न्यायालयाने पालिकेला सुनावले. न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना म्हटले, “महापालिका आयुक्तांकडे विशेषाधिकार असला तरीही तो योग्य पद्धतीने वापरायचा असतो. अन्यथा तेही न्यायिक तपासणीच्या अधीन येते. या प्रकरणात मनमानी पद्धतीने राजीनामा पत्र स्वीकारण्यात दिरंगाई केल्याची दिस आहे.” आणि न्यायालयाने पालिकेला राजीनामा स्वीकारला की नाही. यासंदर्भात 2.30 वाजता भूमिका मांडण्यास सांगितले होते. यानंतर न्यायालयाने निकाल दिला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.