भोपाळ | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आज (१८ एप्रिल) संवाद साधताना त्यांना तुरुंगात झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे.
Pragya Singh Thakur while alleging torture by jail officials says, "Vo kehalvana chahte the ki tumne ek visfot kiya hai aur Muslimo ko maara hai…..subah ho jati thi pit'te pit'te, log badal jate the peetne wale, lekin pitne wali main sirf akeli rehti thi." pic.twitter.com/C0T8rzByVn
— ANI (@ANI) April 18, 2019
साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, ‘मी मुस्लिमांना मारण्यासाठी बॉम्बस्फोट केला आहे, असे विधान माझ्याकडून वदवून घेण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडून मारहाण होत होती. रात्र रात्र भर मारहाण होई. मारहाण करणारी माणसे बदलायची पण मारहाण सुरू राहायची. तसेच असा छळ होणारी मी एकटी नव्हते.” भोपाळ मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.