HW Marathi
राजकारण

उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी !

मुंबई | “भारताच्या हवाई हल्ल्याबाबत मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले की, पाकिस्तानवर भारताने खरंच हल्ला केला का? 300 दहशतवादी खरंच मारले का? आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत की, हल्ल्यात कोणीच ठार झाले नाही. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते.’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी. त्यांच्या डोक्यातील व हनुवटीवरील दाढीतील जळमटे आपोआप दूर होतील. पुलवामा हल्ल्याचे त्यांना दुःख होईल. आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी देशी माध्यमे पाहावीत. ‘सामना’ वाचणे हा तर जालीम उपाय!,अश शब्दात त्यांनी पित्रोदा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

सामनाचे आजचा अग्रलेख

पित्रोदा म्हणतात, “भारताच्या हवाई हल्ल्याबाबत मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले की, पाकिस्तानवर भारताने खरंच हल्ला केला का? 300 दहशतवादी खरंच मारले का? आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत की, हल्ल्यात कोणीच ठार झाले नाही. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते.’’ पित्रोदा यांना वाईट वाटण्याचे कारण नाही. पाकवरील हल्ला योग्यच होता. गरज पडल्यास यापेक्षा मोठा हल्ला करावा लागेल. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमे (इंटरनॅशनल मीडिया) काय म्हणतात ते पाहू नये. उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी. त्यांच्या डोक्यातील व हनुवटीवरील दाढीतील जळमटे आपोआप दूर होतील. पुलवामा हल्ल्याचे त्यांना दुःख होईल. आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी देशी माध्यमे पाहावीत. ‘सामना’ वाचणे हा तर जालीम उपाय!

सॅम पित्रोदा यांना अकलेचे तारे तोडण्याचे काहीएक कारण नव्हते. ते ज्ञानी, शहाणे व अकलेचे कांदे आहेत याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. देशात सध्या जी संगणक, दळणवळण क्रांती झाली त्याचे श्रेय नक्कीच सॅम पित्रोदा यांना जाते. पित्रोदा हे काही काँग्रेसचे कार्यकर्ते वगैरे नसावेत. ते काल राजीव गांधींचे तंत्रज्ञानविषयक सल्लागार होते. आज फार तर ते राहुल गांधींचे त्याच क्षेत्रातले सल्लागार असावेत. मात्र म्हणून त्यांनी देशाच्या संरक्षणविषयक बाबींवर फालतू बकवास करण्याची गरज नाही. आता ‘पुलवामा’ हल्ल्यासंदर्भात अत्यंत फालतू विधान करून पित्रोदा महाशयांनी अकारण टीकेचे वादळ स्वतःवर ओढवून घेतले. ‘पुलवामासारखे हल्ले होतच राहतात. त्यासाठी पाकिस्तानवर हवाई हल्ला करणे चुकीचे आहे,’ असे दिव्य विचार पित्रोदा यांनी मांडले. त्यामुळे काँग्रेसला ऐन निवडणुकीत घाम फुटला आहे. पित्रोदा यांचे वास्तव्य बराच काळ परदेशात असते आणि ते सोयीनुसार हिंदुस्थानात येत असतात. त्यामुळे कश्मीर, पाकिस्तानबाबत स्वदेशातील लोकभावना त्यांना काय समजणार? पित्रोदा यांनी अचानक केलेल्या या तोंड-स्फोटामुळे काँग्रेसवर तोंड झाकून फिरण्याची वेळ आली. अर्थात पित्रोदा हे काही काँग्रेसचे महान कार्यकर्ते, नेते किंवा प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांचे विधान हे काँग्रेसचे अधिकृत विधान मानता येणार नाही, पण ते काँग्रेस किंवा गांधी परिवारातले ‘लाडके’ नक्कीच आहेत. काही मूठभर लोक आपल्या देशात हल्ले करतात म्हणून त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवायचे काय? हा त्यांचा आणखी एक प्रश्न आहे. आता पित्रोदा म्हणतात त्याप्रमाणे

हे मूठभर लोक कोण

व त्या मूठभर लोकांना कोण पोसत आहे? तर नक्कीच पाकिस्तानकडे बोट दाखवावे लागेल. पुलवामासारखे पाकिस्तानपुरस्कृत हल्ले होतच असतात व झाले आहेत, पण हिंदुस्थानकडून हवाई हल्ला मात्र आता केला गेला. कारण 40 जवानांची हत्या झाल्यावर संयमाचा बांध तुटला. शेवटी देशाचा स्वाभिमान व जवानांचा अभिमान नावाचीही एक गोष्ट आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे व हिंदुस्थानला बरबाद करण्याचे षड्यंत्र रचणाऱया अतिरेक्यांचे तळ पाकिस्तानात आहेत. त्यामुळे हल्ला करून बदला घेतला नाही तर जगात आमचा देश षंढांचा देश म्हणून गणला जाईल. आम्ही उघडय़ा डोळ्यांनी जवानांची बलिदाने पाहात बसायचे असे कुणास वाटत असेल तर त्यांच्या धमन्यांत भारतमातेचे रक्त नक्कीच उसळत नसावे. काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही हे पित्रोदा सांगतात. तर्क म्हणून कदाचित ते कुणाला चुकीचे वाटणार नाही, पण प्रश्न पाकिस्तानच्या, तेथील राज्यकर्त्यांच्या हिंदुस्थानद्वेषाचा आणि त्यातून त्यांनी आपल्याविरुद्ध पुकारलेल्या ‘छुप्या युद्धा’चा, आपल्या देशात केल्या जाणाऱया दहशतवादी हल्ल्यांचा आणि त्यात मरण पावलेल्या शेकडो निरपराध्यांचा तसेच हुतात्मा जवानांचा आहे. आता पंतप्रधान श्री. मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त त्याचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील पाकडय़ांच्या राष्ट्रीय दिनावर आमच्या सरकारने बहिष्कार टाकला, पण पंतप्रधान मोदी यांनी मात्र वैयक्तिकरीत्या इम्रान खान यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाही आता वादात अडकल्या व काँग्रेस त्याचे भांडवल करीत आहे. पण एक ‘प्रोटोकॉल’ म्हणून शेजारी देशाच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देणे व पुलवामा हल्ल्याचा बदला घेणे या

दोन वेगळ्या गोष्टी

आहेत. पाकसारखा देश जगाच्या नकाशावर शिल्लक राहू नये ही भावना फक्त हिंदुस्थानचीच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांची आहे. पाकिस्तान हा आता देश उरला नसून जागतिक दहशतवाद्यांचा ‘अड्डा’ बनला आहे. हा अड्डा उद्ध्वस्त करून हिंदुस्थानला सुरक्षित ठेवणे हे आमच्या सैन्यदलाचे कर्तव्यच ठरते. सैन्याने, हवाई दलाने हल्ला केला. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ नष्ट केले. त्यात तीनशेच्या वर अतिरेकी मारले गेले, असे सरकारचे सांगणे आहे. पित्रोदा म्हणतात, “भारताच्या हवाई हल्ल्याबाबत मी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले की, पाकिस्तानवर भारताने खरंच हल्ला केला का? 300 दहशतवादी खरंच मारले का? कारण आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत की, हल्ल्यात कोणीच ठार झाले नाही. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते.’’ पित्रोदा यांना वाईट वाटण्याचे कारण नाही. पाकवरील हल्ला योग्यच होता. गरज पडल्यास यापेक्षा मोठा हल्ला करावा लागेल. हिंदुस्थानी नागरिक म्हणून पाकवरील हल्ल्याचा त्यांना अभिमान वाटायला हवा. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमे (इंटरनॅशनल मीडिया) काय म्हणतात ते पाहू नये. उद्यापासून पित्रोदा यांनी ‘सामना’ वाचायला सुरुवात करावी. त्यांच्या डोक्यातील व हनुवटीवरील दाढीतील जळमटे आपोआप दूर होतील. पुलवामा हल्ल्याचे त्यांना दुःख होईल. त्यातून त्यांच्या धमन्यांतील रक्त संतापाने उसळेल व हिंदुस्थानी सैनिकांनी पाकवर केलेल्या हवाई हल्ल्याने त्यांची छाती भरून येईल. आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी देशी माध्यमे पाहावीत. ‘सामना’ वाचणे हा तर जालीम उपाय!

Related posts

सरकार बोलण्यात ऑनलाईन,कामात ऑफलाईन!: खा. अशोक चव्हाण

Ramdas Pandewad

जे औरंगजेब देखील करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात !

News Desk

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर

News Desk