HW News Marathi
राजकारण

‘सपा’ची पहिली यादी जाहीर, मुलायम सिंग ‘मैनपुरी’ मतदारसंघातून लढणार

नवी दिल्ली | काँग्रेसने गुरुवारी (७ मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी पहिली १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेस पाठोपाठ समाजवादी पार्टी पहिल्या ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव स्व:ता मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लाढविणार आहे. या यादीत धमेंद्र यादव यांना बदायूे येथून तर पक्षाचे महासरचिटणीस राम गोपाल यादव यांचे पूत्र अक्षय यादव यांना फिरोजाबाद येथून समाजवादीने तिकीट दिले आहे. कमलेश कठेरिया (इटावा), भाईलाल कोल (राबर्ट्सगंज), शब्बीर वाल्मिकी (बहराइच) अशी अन्य उमेदवारांची नावे आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी सोनिया गांधी, अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी केली असून प्रत्येकी ३८ जागा लढविणार आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत समाजवादीला ८० जागांपैकी केवळ ५ जागा जिंकता आल्या होत्या. त्यात मुलायम सिंह यांच्यासह त्यांचा पुतण्या धमेंद्र यादव, अक्षय यादव आणि सून डिंपल यादव यांचा समावेश होता.

गेल्या निवडणुकीत मुलायम सिंह यांनी मैनपुरी येथून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्ही जागांवर निवडून आल्यानंतर त्यांनी आजमगड जागा आपल्याकडे ठेवली. तर मैनपुरी येथील जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत मुलायम यांच्या कुटुंबातील तेज प्रताप यादव विजयी झाले होते.

 

Related posts

राहुल गांधींच ‘डबल ए’ तर सीतारामन यांचे ‘आरव्ही’

News Desk

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

News Desk

संभाजी भिडे यांना जामीन मंजूर

News Desk