मुंबई| दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण आणि कंत्राटादारांच्या बदल्यात तसेच काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना बुधवारी हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५ विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असे म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता.
Bombay High Court grants bail to Samir Bhujbal, nephew of Chhagan Bhujbal. He was arrested by the Enforcement Directorate in a money laundering case.
— ANI (@ANI) June 6, 2018
त्यानंतर विविध कायदेशीर मुद्यांवरील त्यांचा युक्तिवाद मंगळवारी झाला. परंतु मंगळवारी हा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी ठेवली होती. बुधवारी सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्तींनी जामीन अर्जावर निर्णय देत समीर यांना जामीन मंजूर केला.
जवळपास सव्वा दोन वर्षांनी समीर भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांनी नाशिकमध्ये जल्लोष साजरा केला आहे. भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. आनंद व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या कार्यालया बाहेर फटाके फोडले फोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.