HW News Marathi
राजकारण

सेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रिपदाची शपथ | संजय राऊत

नवी दिल्ली | शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज (३० मे) मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचविले असून सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

खासदार अरविंद सावंत पहाटे कुटुंबासोबत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. सावंत कुटुंबियांच्या उपस्थिती मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता

राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी सात वाजता होणार्‍या समारंभात नरेंद्र मोदी हे सलग दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी एनडीए ३५२ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१ जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा

Aprna

“मी पुन्हा येईन… या विधानाची टिंगल टवाळी झाली,” फडणवीसांनी सभागृहात टीकास्त्र सोडले

Aprna

तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

Aprna