HW News Marathi
राजकारण

प्रियांका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

नवी दिल्ली | काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट टाकली आहे. प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज दुपारी १.३० वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याने या बैठकीतच चतुर्वेदी यांच्या प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्वीटरवर ट्वीट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी लिहिले आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांना काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघाची उमेदवारी उर्मिला मातोंडकर यांना देण्यात आली. त्यामुळे देखील प्रियांका चतुर्वेदी पक्षावर नाराज होत्या, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या मथुरा येथील राफेलसंदर्भातील पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रियांकाशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार केल्यानंतर दोषी आढळलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी जोतिरादित्य सिंधिया यांनी हस्तक्षेप करत या पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले. इतकेच नव्हे तर त्यांना पुन्हा त्यांची पदे देखील दिली. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाबद्दल प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दुश्मन का दुश्मन दोस्त होता है”; अनिल परबांचे बच्चू कडू यांच्यासंदर्भात सूचक विधान

Darrell Miranda

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण! – मुख्य निवडणूक अधिकारी

Aprna