HW News Marathi
राजकारण

सत्यजित तांबे महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

मुंबई |आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून नव्याने पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांची निवड निश्चित झाल्याचे मानले जात आहे. ९,१० आणि ११ सप्टेंबर रोजी या पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतदान होणार आहे.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे, माजी मंत्री सुभाष झनक यांचे चिरंजीव आमदार अमित झनक आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांच्यामध्ये प्रमुख लढत पहायला मिळणार आहे.

काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांचा आणि आमदारांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या लढतीत सत्यजित यांचे पारडे जड असून युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विवेक ओबेरॉयवर महिला आयोग करणार कारवाई

News Desk

२ पेक्षा अधिक मुले झाल्यास मिळणार इन्सेंटिव्ह !

News Desk

शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर केल्या ‘या’ तीन महत्वाच्या घोषणा

Aprna