HW News Marathi
देश / विदेश राजकारण

राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाच्या वकिलांनी ‘या’ केसचा दिला हवाला

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तांतरावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्तांतरावर सुनावणीचा आज (16 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. शिंदे गटाने आजच्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी (senior lawyer Mahesh Jethmalani) यांनी युक्तीवाद केला आहे. यावेळी राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय कसा योग्य होता हे, सांगण्याचा प्रयत्न महेश जेठमलानींनी केला आहे.

यावेळी महेश जेठमलानी सर्वोच्च न्यायालयात मध्य प्रदेशातील 2020 एका केसचा हवाला देत म्हणाले, “ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले होते. या केसचा हवाला दिला आहे. या केसच्या आधार घेत राज्याच्या राजपालांचा निर्णय योग्य असल्याचा प्रयत्न केला.

उपाध्यक्षांनी अपात्रेची नोटीस दिली होती. त्यावेळी फक्त दोन दिवसांची मुदत दिली होती. कायद्यानुसार किमान सात दिवसांची मुदत देणे अपेक्षित होते. परंतु, उद्धव ठाकरेंनी 29 जून रोजी त्यांनी राजीनामा दिला. कारण उद्धव ठाकरेंना माहिती होती की, ते बहुमत चाचणीमध्ये बहुमत सिद्ध करू शकणार नाही. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी अपात्रतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली होती. मग, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हा फरक पडला का?, असा सवाल त्यांनी केला.

Related posts

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसांच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक

News Desk

मोदी आणि राज यांच्यात का..रे…दुरावा..!

swarit

सोनिया गांधी रुग्णालयात उपचार घेत असतानाच नेतृत्वावरुन पत्र का पाठवले? राहूल गांधींचा सवाल

News Desk