HW News Marathi
राजकारण

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

मुंबई | तब्बल दोन तास झालेल्या चर्चेनंतर अमित शाह-उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक साडे नऊच्या सुमारास संपली. यावेळी त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांचे जेथे अखेरपर्यंत वास्तव्य होते, त्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये गुप्त चर्चा झाली. उद्धव ठाकरे-अमित शाह वगळता त्यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानातंर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असल्याचे सांगण्यात आले असले तरीही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्वपुर्ण समजली जात होती. बंद दाराआड ठाकरे आणि शाह यांच्यात चर्चा सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये या भेटीविषयी प्रचंड उत्सुकता होती.

सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोघांमधील प्रदीर्घ चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीत सहभागी झाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

News Desk

अण्णासाहेब मायकर व्हायरल ऑडिओ क्लीपवर विनायक मेटेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Aprna

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar
राजकारण

अमित शहा मातोश्रीवर दाखल

News Desk

मुंबई | पालघर पराभवानंतर अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. त्यातच सामना मधून शिनसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतल्यामुळे या दौ-यात शहा ठाकरेंची भेट घेणार का ? असे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.

https://twitter.com/ANI/status/1004370632782442496

परंतु सुधारीत वेळापत्रकात शहा उद्धव भेटीचा उल्लेख नसला तरीही अखेर अमित शहा बुधवारी सायंकाळी मातोश्री येथे उद्धव यांची भेट घेत आहेत. सायंकाळी ७ च्या सुमारास अमित शहा मातोश्री येथे दाखल झाले आहेत. शहा उद्धव भेटीत नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर यापुढे युती रहाणार की तुटणार यावर ठोस शिक्कामोर्तब होणार आहे.

 

Related posts

मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा! – नाना पटोले

Aprna

ठाण्याच्या कचर्‍यावर पोसली जातेय शिवसेना !

News Desk

#LokSabhaElections2019 : विजयसिंह मोहिते-पाटील देखील मनाने भाजपमध्येच आहेत !

News Desk