HW News Marathi
राजकारण

शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले अनुपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्यावर खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या क्रार्यक्रमासाठी राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री कार्यक्रमात उपस्थित आहे. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मात्र अनुपस्थित राहणार आहेत. उदयनराजे भोसलेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रतापगडावरील कार्यक्रमात भवानी मातेची पूजा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज (30 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता सुरू झाला आहे. या कार्यक्रमासाठी उदयनराजेंनी उपस्थित रहावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारी रात्रीपर्यंत (29 नोव्हेंबर) प्रयत्न सुरू होते. पण, उदयनराजे भोसले हे कार्यक्रमात गैरहजर राहिले. येत्या 3 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा मेळाव्यात नियोजनात कार्यक्रत्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे उदयनराजे भोसले हे प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. असे सांगण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफझल खानाचा वध केला. या शौर्याचा दिवस म्हणून शिवप्रताप दिन म्हणून प्रतापगडावर साजरा केला जातो. या दिवशी प्रतापगडावर ढोल-ताशांचा गजर होतो. या सोहळ्यासाठी प्रतापगड विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. ऐवढचे नाही तर लेझरच्या सहाय्याने गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याची गाथा ही दाखवली जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील,” आदित्य ठाकरेंची माहिती

Aprna

परळीसाठी 100 कोटींचा निधीच्या श्रेयवादावरुन मुंडे बहिण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने 

Aprna

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यावर भडकल्या ममता दीदी

News Desk