HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले की, भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑर्बिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. शक्ती मिशनचे संपूर्ण देशभरात कौतुक होत असताना मात्र तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे ट्विट आहे.

या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधत टीका केली आहे. मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना मिशन शक्तीच्य यशाची माहिती दिली. याचा अर्थ भाजपला ऑक्सीजनची गरज आहे. भाजपची बुडत्या बोटीला मिशन शक्तीचा आधार मिळाला आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींकडून निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे.

 

Related posts

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

News Desk

अखेर रोहित पवार यांनीच सांगितले ‘त्या’ भेटीमागचे कारण

News Desk

भाजप पूर्णपणे मोदी-शहांच्या कब्जात आहे | निरुपम

News Desk