HW News Marathi
राजकारण

शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले आहेत !

सोलापूर | “शरद पवार हे भाजपच्या ट्रॅकमध्ये अडकले आहेत”, असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते राहिले नसून ते केवळ बारामतीचे नेते राहिले आहेत”, अशीही गंभीर टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आता लयाला गेले आहेत. त्यांच्यापेक्षा आता आम्हीच भक्कम विरोधक झालो आहोत. आम्ही आता येत्या विधानसभा निवडणुकांची तयारी करत आहोत. येत्या विधानसभेत आम्ही मुख्य राजकीय पक्ष असू” ,असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर सत्ता मिळवण्याच्या नादात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चे विघटन केले आहे. त्यांना पुन्हा संघटन उभारायचे असेल तर या दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणामुळे अनिल परब ED चौकशीला गैरहजर

Aprna

लोकसभा निवडणुका लढविण्यास मनसे इच्छुक नाही ?

News Desk

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk