HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही !

अकोला | “मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली मात्र ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांची अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे संग्राम गावंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज (९ ऑक्टोबर) सकाळी पार पडली. “गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. या दौऱ्यात मला एक चित्र दिसतंय की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोक भाजप आणि शिवसेनेवर नाराज आहेत”, असेही शरद पवार म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत युद्ध झाले तेव्हा सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नाही मात्र मोदींनी ते श्रेय घेतले”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

“मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. शेतकरी हैराण आहे, तरुण बेरोजगार आहे, सामान्य माणूस पिचला आहे. मग हे सरकार आहे कुणासाठी ? असा संतप्त सवाल शरद पवार यांनी केला. “आम्ही ठरवले आहे की नवी पिढी राजकारणात आणायची आहे. काँग्रेसच्या विचारांनी, गांधी, नेहरुंच्या विचारांनी हा देश बनला आहे. स्वातंत्र्यकाळातही हा भाग घाबरला नव्हता. आता मोदींनाही आम्ही ठणकावून सांगू की तुम्हाला आम्ही घाबरणार नाही. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या” असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

Related posts

२००० रुपयांची निवडणुकांमध्ये वाटायला आणली का ?

News Desk

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

धनंजय दळवी

बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है…!

News Desk