HW News Marathi
राजकारण

शरद पवार देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास तयार !

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेनन यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येऊन शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करावे, असे आवाहन देखील मेमन यांनी केले आहे. मेनन यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वगळून अन्य ३ नेत्यांची नावे देशाच्या पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, आता शरद पवार हे स्वतः पंतप्रधान पदासाठी तयार असल्याचे मेनन यांनी म्हटले आहे.

“देशातील सध्याची स्थिती काही फारशी चांगली नाही. त्यामुळे देशाला शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे”, असेही मेनन यावेळी म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत “यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे. त्यामुळे विरोधकांमधून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती हे ३ जण पंतप्रधान पदासाठी प्रमुख उमेदवार असतील”, असे म्हटले होते. “राहुल गांधी यांनी अनेकदा स्वतःच सांगितले आहे कि ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले असल्याचे वृत्त होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्ष नेत्यांची वाढलेली जवळीक ठरणार भाजपच्या धास्तीचे कारण

News Desk

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

News Desk

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk