HW News Marathi
राजकारण

मी घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटण दाबले अन् कमळाला मत गेले !

सातारा | “मी स्वतः ईव्हीएम मशिनचा अनुभव घेतला आहे. माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटण दाबायला सांगितले. मी घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटण दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः पाहिले आहे”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. प्रत्येक मशीनमध्ये असे असेलच असे मी म्हणत नाही. मात्र मी हे स्वतः पाहिल्याने काळजी व्यक्त केली असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. सातारा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देखील शरद पवार यांनी भाष्य केले आहे. “राजीव गांधी हयात नसताना त्यांच्यावर टीका होणे योग्य नाही. राजीव गांधींचा मृत्यू हा त्यांत दुर्दैवी होता. आतापर्यंत गांधी परिवाराने देशाला दोन पंतप्रधान दिले. त्या दोघांचीही हत्या झाली. या परिवाराने इतका मोठा त्याग केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा पंतप्रधान पदाला शोभणारी नाही. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मोदींचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोहर पर्रिकरच राहाणार गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

News Desk