HW News Marathi
राजकारण

शरद पवारांनी घेतली राणेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

कणकवली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज(३ डिसेंबर) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. दुपारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी पवार दाखल झाले. नारायण राणे यांच्याशी पवार यांनी चर्चा सुरू असून राष्ट्रवादीशी राणेंचा स्वाभिमान पक्ष हातमिळवणी करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पवार यांनी देवली उदय फार्म मत्स्य शेती केंद्र येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

नारायण राणे हे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. परंतु,काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याचे चिन्ह दिसत आहेत. ही संधी पवार यांनी हेरली असून कोकणात नारायण राणे यांच्या साथीने पुन्हा सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे खाते उघडण्याच्या प्रयत्नात राणे असल्याची शक्यात वर्तविली जात आहे.

पवारांचे राणे कुटुंबीयांनी केले स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह नीलम राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डॉन्टस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या वायनाडमधील रोड शो दरम्यान ३ पत्रकार जखमी

News Desk

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aprna

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk