HW News Marathi
राजकारण

शरद पवार ६ नोव्हेंबरपासून राज्याच्या पाहणी दौऱ्यावर

मुंबई । राज्यात झालेल्या परतीच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ६ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार हे दौऱ्याच्या सुरुवातीला परभणीतील सेलू तालुक्यातील काही भागांची तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागाची पाहणी करतील. त्याचप्रमाणे परभणी, हिंगोलीनंतर ते नांदेड जिल्ह्याची देखील पाहणी करणार आहेत. यंदा परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले असून राज्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात झालेल्या या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा, विदर्भासह नाशिकमधील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, कापूस, बाजरीसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या या हानीच्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर व्हावी, त्याचप्रमाणे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यांसह अन्य काही मागण्यांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) राज्यपालांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Aprna

आता ममतांसाठी ‘ही’ तज्ञ व्यक्ती आखणार निवडणुकांची रणनीती

News Desk

बेस्टच्या संपाचा आज पाचवा दिवस, बेस्ट कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk