HW News Marathi
राजकारण

कामोठेमध्ये पैसे वाटप करणाऱ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

नवी मुंबई | कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघा शेकाप कार्यकर्त्यांना काल (२७ एप्रिल) अटक करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांनी मतदारांना प्रत्येक ४०० रुपयांचे वाटप करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यानंतर शेकापचा कार्यकर्ता आता कामोठे पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेकाप कार्यकर्त्यांजवळून ११ हजार ९०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांची संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पनवेलचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातव्या वेतन आयोगाचे ‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का ?

News Desk

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna