HW News Marathi
राजकारण

“शिंदे गटही टिकणार नाही, अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये जाणार”, संजय राऊतांची भविष्यवाणी

मुंबई | “शिंदे गटही टिकणार नाही, यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये स्वत:ला विलीन करून घेतली”, अशी भविष्यवाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे, याविधानानंतर केली आहे. “आत्मपरीक्षण जसे मी केले पाहिजे, तसे आमच्या त्यावेळच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील केले पाहिजे”, असे वक्तव्य केले होते. केसरकराच्या वक्तव्याचा राऊतांनी आज (2 जानेवारी) माध्यमांशी बोलताना खरपूस समाचार घेतला.

 

राऊत म्हणाले,  “शिंदे गटात काय घालमेल सुरू आहे. काय हालचाली सुरू आहेत. कसे वाद सुरू आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, हे सरकार टिकणार नाही. हा गटही टीकणार नाही. यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये स्वत:ला विलीन करून घेतली. ते त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना परत शिवसेना स्वकारणार नाही. आणि दुसरा म्हणजे त्यांच्याकडे पर्याय नाही. दीपक केसरकर त्यांनी आत्मपरिक्षणाची केलेली भाषा ऐकत, एकत्र येण्याची भाषा हे त्यांच्या गटाचे वैफल्य आणि निराषा आहे.”

 

केसरकरांनी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे, असे विधानासंदर्भात पत्रकारांनी राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले,  “आत्मपरीक्षण कोणी करायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. आत्मपरीक्षण जर गद्दार सांगत असतील करा, आम्हाला तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरविलेले आहे. जे गद्दार आहेत. ते सोडून गेलेले आहेत. त्यांना पुन्हा परत लोकसभेत किंवा विधानसभेत पाठवायचे नाही. आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना पूर्वी इतक्याच जोमाने वाढते आणि भोपावते. ज्या आर्थ दीपक केसरकरांना वाटेत दोन्ही गट एकत्र यावे, त्यांनी आत्मपरीक्षण केले आहे. तर अधी त्यांनी आत्मपरीक्षण करावे, आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडत आहेत. म्हणजेच त्यांच्या गटात अजून काही गट निर्माण झालेले आहेत. आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे. ही आमची माहिती आहे.काल तुम्ही आब्दुल सत्तारांचे ऐकले असेल की, माझ्या गटातील लोक माझ्याविरोधात माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही काही तरी स्पष्टपणे समजून घ्या”, असा सूचक इशारा राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

 

दीपक केसरकर नेमके काय म्हणाले

दीपक केसरकर म्हणाले,  “पैशासाठी मणुष्य विकला जात नाही. त्याचे मन जिंकायला लागते. आणि ते मन शिंदे साहेबांनी जिंकले. म्हणून आमदार त्यांच्याबरोबर केले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा लढा लढविला. ते लोक असे सहजासहजी सोडून जात नाही. काही तरी निश्चितपणे असे घडलेले आहे. ज्यामुळे ही लोक बाहेर पडली आहेत. आणि ते काय घडले, याचे आत्मपरीक्षण जसे मी केले पाहिजे, तसे आमच्या त्यावेळच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील केले पाहिजे, असे मला वाटते. आणि तसे झाले तर मग शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही.”

 

 

Related posts

“…त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही” जयंत पाटलांचा टोला

Aprna

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk

संजय राऊत प्रकरणात ED ने दोन ठिकाणी टाकले छापे

Aprna