मुंबई | मनसे नेते शिशीर शिंदे पुन्हा एकदा शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या १९ तारखेला शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिंदेंचा सेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबई उपनगरात मनसेला मोठा फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीनंतर शिशीर शिंदे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती अखेर शिंदे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे.
शिशीर शिंदे शिवसेनेत जाण्याविषयी काहीशा द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी स्पष्टता नव्हती. मात्र, महिनाभर विचार करून त्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. राम कदम आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता शिशीर शिंदे मनसेतून बाहेर पडणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल.
- शिंदेंचा राजकीय कार्यकाळ
- राजकीय कारकीर्दीला शिवसेनेतून सुरुवात
- १९९२ साली ते मुलुंडमधील शिवसेनेचे नगरसेवक
- शिवसेनेचे उपनेतेपद
- शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग
- बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली
- शिशीर शिंदेंनी १९९१ मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली
- १९९६ ते २००२ या काळात विधानपरिषदेचे सदस्य
- २००६ मध्ये मनसेत प्रवेश
- २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर विजय
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.