HW News Marathi
राजकारण

शिशीर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | मनसेचे नेते शिशीर शिंदे यांनी अखेर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला.मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला आहे. यावेळी मनोगत व्यक्त करत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना शिशीर शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली”. शिवसैनिकांनो मी चुकलो मला माफ करा. शिवसेना सोडणे ही माझी चूक होती, असे म्हणत शिशीर शिंदे पुढे म्हणाले, यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नगरसेवकाची भारत मॅट्रिमोनी विरोधात तक्रार

News Desk

पंतप्रधानांचे फक्त दोनच व्यक्तींवर प्रेम, पहिले गांधी-नेहरु आणि दुसरा मी ! 

News Desk

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग

Aprna