HW News Marathi
राजकारण

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा आज होणार ?

मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होणार आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (१८ फेब्रुवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभेचे जागावाटप जाहीर करतानाच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटप ठरविण्यात यावे असा शिवसेनेचा आग्रह होता. सेनेचा हा आग्रह भाजपाने मान्य केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीतसाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्ष २३-२५ जागा लढवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१४फेब्रुवारी) राज्यातील दौरा अर्धवट टाकून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली होती. या भेटी दरम्यान झालेल्या सर्व चर्चा या सकारात्मक होत्या. परंतु या भेटी झालेल्या चर्चे बद्दल कोणालाही न सांगण्याचे आदेश फडणवीस यांनी त्यांच्या शिष्ट मंडळांना दिले होते. या युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचे आणि मुख्यमंत्र्यांची मातोश्री शिष्टाई यशस्वी झाल्याचे मानले जाते. विधानसभेच्या १४५ जागा भाजप तर सेना १४३ जागा लढवेल, अशी माहिती सूत्रांनी सांगितली आहे. सेननेे पालघरच्या जागाचा अट्टहास भरला होता. भाजपने सेनेचा हा हट्ट मान्य केल्यामुळे युती झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान २०१४साली केंद्रात भाजपला एकहाती सत्ता आल्यानंतर मित्र पक्षांना म्हणजे शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली गेली. तसेच राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका भाजपने घेतल्यामुळे दुखावलेल्या सेनेने आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात युतीची घोषणा झाली तर या युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या ED च्या कारवाईबाबत अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Aprna

फडणवीसांच्या कार्यकाळात तब्बल ६५ हजार कोटींचा आर्थिक घोटाळा

News Desk

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र

Aprna