HW News Marathi
राजकारण

शिवसेना-भाजप युतीचा चर्चा अंतिम, लवकरच होणार घोषणा !

मुंबई | शिवसेना-भाजप युतीचr चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच युतीसंदर्भात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकरे या तिघांमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच युतीची घोषणा फडणवीस आणि ठाकरे करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी आज (२४ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नावर मौन धारण केले. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये अवघ्या १० जागांमुळे मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे. काल (२३ सप्टेंबर) उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे. त्यामुळे या युतीची घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा आज होणार ?

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

News Desk

जोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत हिंदू-शीख सुरक्षित होते !

Gauri Tilekar