HW News Marathi
राजकारण

“40 डोक्याच्या रावनाने प्रभू रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले”, उद्धव ठाकरेंचे शिंदेवर टीकास्त्र

मुंबई | “40 डोक्याच्या रावनाने प्रभू श्री रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत पक्षाची तीन नावे आणि चिन्ह आहे, निवडणूक आयोगा लवकर निर्णय घेईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आज तुमच्यासमोर येण्याचे कारण काय?, निवडणूक आयोगाने काल जो निर्णय घेतला. शिवसेनेचे नाव गोठवले. शिवसेनेचे नाव गोठवले, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे गोठवले. म्हणजे आज देखील ते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण ज्याची शिवसेना प्रमुख मनोभावे पुजा करत होते. त्याची पुजा आजही देवाऱ्यात होते.  तो धनुष्यबाण आजही आहे. पण 40 डोक्याच्या रावनाने प्रभू श्री रामचंद्रचे धनुष्यबाणही गोठावले. ”

पक्षप्रमुख झाल्यानंतर मी आठवण म्हणून सांगत होतो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ. ज्या वेळाला फोडला. ती वेळ सकाळीची साधारण 9-9.30 ची वेळ असेल. आणि आम्ही घरीच सगळे लोक होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलून तो नारळ वाढवला गेला. त्या नाळनातून जे पाणी उडाले. त्यांचे तुषार अंगावर उडाले. एक क्षण जरा अंगावर सगळे उडाल्याने अंगशहारले होते. कारण मला कल्पना नव्हती. मी तेव्हा 6 वर्षाचा होतो. त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्याने ऐवढे चिंब भिजवून टाकतील. याची मला कल्पना नव्हती. म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावे लागले. मुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळी मला त्या पाण्याने भिजवून टाकले होते. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रुमध्ये मी भिजतोय. ते अश्रु केवळ दुखाचे नाहीये, तर ते उदवेगाचे आहे.

दसरा मेळावा होऊ नये, म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केला

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय. ते ऐवढ्यासाठी देतोय, काल, परवा शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला. आपला दसरा मेळावा झाला. आपला पारंपारिक दसरा मेळावा झाला. तोही होऊ नये. म्हणून या खोकासुरांनी प्रयत्न केला होता. शिवतीर्थ मैदान शिवसेनेला मिळता कामा नये. पण शेवटी न्याया देवता. ही न्याय देवता या शब्दाला जागली. आणि त्यांनी न्याय दिला.”

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंकडून फेसबूकच्या माध्यमातून पक्षाचे नाव आणि चिन्ह जाहीर

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिशीर शिंदे स्वगृही परतणार ?

News Desk

पाकिस्तानने अणूबॉम्ब ईदसाठी ठेवलेला नाही, मेहबुबा मुफ्तींना पाकिस्तानचा पुळका

News Desk

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला

News Desk