HW News Marathi
राजकारण

“…बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरतेय”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

मुंबई | “मुले पळवणारी टोळी ऐकली आहे. पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे”, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर आज (21 सप्टेंबर) पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा घेतला. “दसरा  मेळावा (Dussehra Melava) हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे,” असा इशारा देखील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “व्यासपीठावर आल्यावर मी एक-दोन गोष्टी बघितल्यात एक तर पहिली रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत एक खुलासा करून टाकतो, नाही तर उद्या चौकट यांची की, संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. नाही मिंदे सगळे तिकडे गेलेले आहेत. पण संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. या निश्चयाने लढतायत, आणि या लढाईसोबत आहेत. तलवार हाता घेऊन आघाडीवर आहेत. दुसरे व्यासपीठावर आल्यावर बघितले की, आमचे वडील आहेत का जागेवर कारण मुले पळवणारी टोळी ऐकली आहे. पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरत आहे.  मला आश्चर्य वाटते की ऐवढी वर्ष तुम्ही आम्ही सगळ्यांच यांना सत्तेचे दुध पाजले. आणि आता तोंडाची गटारे उघडली आहेत. जाऊ देत मला त्यांच्यावर बोलण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळे त्यांना उत्तर देत आहात.”

 

संबंधित बातम्या

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसंतदादा पाटील यांचा नातू प्रतिक पाटील यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

News Desk

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

News Desk

मनसे विधानसभा निवडणूक लढविणार, पहिली प्रचार सभा ५ ऑक्टोबरला

News Desk