HW News Marathi
राजकारण

परभणीत अत्यंत क्षुल्लक कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या

परभणी | परभणीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. परभणीतील जायकवाडी परिसरात एका क्षुल्लक कारणावरून शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (३१ मार्च) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली आहे. जायकवाडी परिसरामध्ये पाणी भरण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादातून अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अमरदीप रोडे हे जायकवाडी परिसरामध्ये पाणी भरण्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी अमरदीप रोडे यांचा किरण सोपानराव डाके आणि रवी वसंतराव गायकवाड यांच्यासोबत टोकाचा वाद झाला. अमरदीप रोडे यांना डाके आणि गायकवाड यांनी दगड आणि कुर्‍हाडीने जबर मारहाण केली. यातच अमरदीप रोडे यांच्या मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा जो छळ केला त्याची माफी मागणार का ?

News Desk

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

फडणवीस यांच्या काळात राज्य जातीय अराजकतेत

News Desk