HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदेंनी केली सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी

मुंबई | शिवसेनेच्या विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि एकनाथ शिंदेंनी सुनील प्रभू यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदी नियुक्ती अवैध केल्याची माहिती बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.  एका बाजुला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना काल (21 जून) गटनेते पदावरून हटविले होते. शिवसेनेच्या गटनेत्या पदी अजय चौधरी यांची नवे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी सुनील प्रभू यांना विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावरून हटविले.

दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची नियुक्ती होती. यावर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला होता. गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती ही चुकीची असून 15 आमदारांच्या स्वाक्षरीवर गटनेते पदी नियुक्ती करता येत नाही. आमच्याकडे जास्त बहुमत आहे. त्यामुळे गटनेते पदी एकनाथ शिंदेच राहणार आहेत, असे वक्तव्य शिंदे गटाकडून व्यक्त केले आहे.

सुनील प्रूभ यांनी आज सायंकाळी 5 वाजता सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत हजर राहण्यासाठी प्रभू यांनी बंडखोर आमदारांना पत्र पाठविले होते. या पत्रानुसार बैठकीत हजर न राहिल्याचे निर्देश दिले असून बैठकीला आमदार गैरहजर राहिल्यास शिवसेनेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्रातून दिला होता.

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; तर अजय चौधरी नवे गटनेते

 

 

Related posts

बांगलादेशी नामशुद्र दलितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार !

News Desk

ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी, संदीप नाईक यांची माघार

News Desk

राफेल डीलची ऑडिओ क्लिप खरी | राहुल गांधी

News Desk