HW News Marathi
राजकारण

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी हजर राहणार?

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. ईडीने राऊतांना गोरेगाव कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यातासाठी आज (20 जुलै) बोलविले आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राऊत हे दिल्लीत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनानंतर ईडीकडे पुढील तारीख मागणार आहे, अशी माहिती राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राऊत म्हणाले,  “मला समन्स आले हे मी पाहिले नाही कारण मी दिल्लीत आहे. मी राजकीय घडमोडींमध्ये व्यस्त आहे. आणि व्यस्तच राहिन, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तेव्हा मी या देशाचा नागरिक म्हणून खासदार म्हणून माझे कर्तव्य समजतो, आणि तपास यंत्रणेचा आदरण करणे, मला वाटते नाही, तरी लोकांना वाटत असेल मी चुकीचा आहे. या राजकीय घडामोडींचा हा एक भाग आहेत. मी या यंत्रणांना जी जी माहिती हवी आहे. ते देण्यासाठी मी उपलब्ध असतो. आणि यावेळेलाही ईडी कार्यालयात जाईन.”

याआधी ईडीने राऊतांना 1 जुलै रोजी हजर राहण्याचा समन्स जारी केला होता. यावेळी राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले होते. तेव्हा ईडीने राऊतांनी जवळपास 10 तास चौकशी केली होती.या प्रकरणी ईडीने राऊतांना 28 जून रोजी  समन्स बजावला आहे. परंतु, तेव्हा राऊत चौकशीसाठी अनुपस्थित राहिले होते. यानंतर राऊतांच्या वकिलांनी मुदतवाढीसाठी मागणी केली होती. मात्र, ईडीने मुदतवाढ करण्याची मागणी फेटाळून लावली होती. या कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे 2018 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत चौकशीसाठी ED कार्यालयात दाखल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीच्या पराभवाला ‘मी’च जबाबदार | राहुल गांधी

News Desk

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाला कंठस्नान घालण्यात यश

News Desk

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात गोंधळ

News Desk