पणजी | गोव्यात शिवसेनेने भाजप विरोधात २ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. “भाजपसोबत युती होणार नाही,” असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी आज (१६ मार्च) गोव्यात पत्रकार परिषद घेऊन उमेवारांची नावे जाहीर करताना म्हणाले आहे. गोव्याचे शिवसेनेचे प्रमुख नेते जितेश कामत यांना उत्तर गोवा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दक्षिण गोवा क्षेत्रातून गोव्याच्या शिवसेना उपाध्यक्ष राखी प्रभूदास नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची घोषणा राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: Shiv Sena has given ticket to Goa Shiv Sena chief Jitesh Kamat from North Goa while vice president of the state unit, Rakhi Prabhudesai Naik from South Goa. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/iEtai8uedy
— ANI (@ANI) March 16, 2019
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपसोबतद युती केली असली तरी गोव्यात मात्र सेना भाजपविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. गोव्यात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातील मांदे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, असे राऊत म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.