HW News Marathi
राजकारण

आता बिहारमध्ये शिवसेनेचे एनडीएला खुले आव्हान

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. शिवसेनेकडून आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना बिहार राज्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

बिहार हा एनडीएचा बालेकिल्ला मानला जातो. आता येथील जागा वाटपाची प्रक्रिया देखील पार पडली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना पंतप्रधान बनविण्याचे एकमेव लक्ष्य सध्या एनडीए पुढे आहे. २०१५च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील स्वबळावर लढलेल्या शिवसेनेच्या पदरी निराशा आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपले नशीब आजमाविण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीएने २३ डिसेंबर रोजी बिहारमध्ये जागावाटपावर शिक्कामोर्तब केला आहे. भाजप आणि संयुक्‍त जनता दल प्रत्येकी १७ जागा लढवणार असून यात रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्‍ती पक्षाला ६ जागा देण्यात आल्या आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा करण्यात आली होती

“शिवसेना पक्ष कधीही बिहारी लोकांच्या विरोधात नव्हता. शिवसेनेने बिहारी लोकांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील विरोध केला आहे. मुंबईतील छटपूजेत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतात”, असे राज्य प्रमुख कौशलेन्द्र यांनी म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश कुमार यांनी शिवसेनेच्या या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; 12 ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला

Aprna

आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

News Desk

मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk