Connect with us

राजकारण

भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत ?

News Desk

Published

on

मुंबई | पंतप्रधान मोदी हे सोलापुरात प्रचारी भाषणाचा धुरळा उडवीत असतानाच नवी मुंबईत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगार मरण पावले. शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना राज्य सरकारने जाहीर केल्या. त्यात शेतमजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, वर्तमानपत्रे आणि दूध वाटणारे, अगरबत्ती आणि चपलांच्या व्यवसायातील कामगार, रंगकाम करणारे, यंत्रमाग कामगार, दुकाने आणि गोदाम हमाल, रिक्षाचालक, सुतारकाम करणाऱ्यांचा असंघटित कामगारांत समावेश केला आहे व त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य, शिक्षण, घरे, अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख रुपये मदत करण्याचे ठरवले आहे. हे योग्यच आहे, पण मॅनहोलमध्ये तडफडणारे कामगार त्यात आहेत काय ते सांगा. पनवेलमध्ये तीन कामगार मेले. भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत?, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला

सामनाचे आजचे संपादकीय

शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना राज्य सरकारने जाहीर केल्या. त्यात शेतमजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, वर्तमानपत्रे आणि दूध वाटणारे, दुकाने आणि गोदाम हमाल, रिक्षाचालक, सुतारकाम करणाऱ्यांचा असंघटित कामगारांत समावेश केला आहे व त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य, शिक्षण, घरे, अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख रुपये मदत करण्याचे ठरवले आहे. हे योग्यच आहे, पण मॅनहोलमध्ये तडफडणारे कामगार त्यात आहेत काय ते सांगा. पनवेलमध्ये तीन कामगार मेले. भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत?

पंतप्रधान मोदी हे सोलापुरात प्रचारी भाषणाचा धुरळा उडवीत असतानाच नवी मुंबईत मॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगार मरण पावले. एका बाजूला आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णांना आरक्षण दिल्याचा आनंद साजरा केला जात आहे. दलित, शोषितांचे एकमेव तारणहार फक्त आपणच आहोत असा डांगोरा पिटला जात आहे. राज्याराज्यांत जाऊन योजनांच्या घोषणा होत आहेत आणि दुसरीकडे गरीब मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरावे लागत आहे आणि त्यात गुदमरून जीव गमवावा लागत आहे. पनवेल येथील काळुंद्रे गावात दोन दिवसांपूर्वी तीन कामगारांचा अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये उतरून कामगार मरण पावल्याची ही पहिलीच दुर्घटना नाही. मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक शहरांत असे प्रकार घडले व गरीब कामगारांनी आपले जीव गमावले आहेत. नाले व गटारे साफ करण्यासाठी याआधी बाल कामगारांचा वापर होत असे. त्यांचेही त्यात काही वेळेस प्राण गेले. काही तरुण मुलेही असे काम करताना मरण पावली. हे काही आजच घडले असे नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून घडत आहे. मुंबईसारख्या शहरात आगी लागतात किंवा लावल्या जातात. त्यात नागरिकांबरोबर अग्निशमन दलाचे जवानही होरपळून मरण पावतात. मंत्रालयात जाऊन

सामान्य जनता आत्महत्या

करते. कुठे शिक्षणमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांना बदडून काढले जाते. हे सत्य भीषण आहेच, पण घरची चूल पेटवण्यासाठी नाल्यात, गटारांच्या मॅनहोलमध्ये जेव्हा गरीब मजूर उतरतो व मरण पावतो तेव्हा मन जास्तच अस्वस्थ होते. मजुरांनी स्वतःच्या जबाबदारीवर अशा भुयारी गटारांत उतरायचे व नशिबाने साथ दिली तर जिवंत बाहेर यायचे. पनवेल काळुंद्रे येथे तीन मजुरांना नशिबाने साथ दिली नाही व ते मरण पावले. हे मजूर ठेकेदारीवर होते व त्यांचे नाव, गाव, पत्ताही कुणास माहीत नाही. मोदी यांच्या काळात कामगार क्षेत्र मोडीत निघाले. अर्थात त्याची सुरुवात त्याआधीच झाली होती. तरीही अशा गरीब मजूर, कामगार वर्गाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवण्यात आले. ते स्वप्न प्रत्यक्षात काही उतरले नाही आणि मजूर वर्गाचे गुदमरून मरणे सुरूच राहिले. पनवेलप्रमाणे आतापर्यंत असे किती कामगार गटारी साफ करताना मरण पावले व त्यास जबाबदार कोण, त्या कामगारांना काय भरपाई दिली हे राज्य किंवा केंद्र सरकार सांगू शकेल काय? ही साफसफाईची कामे कंत्राटी पद्धतीने दिली जातात. म्हणजे कामगारांच्या जगण्या-मरण्याशी आपला काही संबंध नाही. ठेकेदार व त्याचे मजूर काय ते बघून घेतील. अशा पद्धतीने सरकार-प्रशासन स्वतःचे हात झटकून टाकू शकते. कश्मीरात लष्कराने मारलेल्या अतिरेक्यांना सरकारी तिजोरीतून नुकसानभरपाई मिळते, पण ‘मॅनहोल’मध्ये

गुदमरून मेलेल्यांकडे

कुणी ढुंकूनही पाहत नाही. पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी मोठे आंदोलन हाती घेतले. स्वतः हाती झाडू घेतला व त्या झाडूच्या प्रसिद्धीसाठी शे-पाचशे कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले. मात्र त्याऐवजी सफाई कामगार गुदमरून का मरतात, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर खर्च झाला असता तर बरे झाले असते. रेल्वे रुळावर काम करणारे ‘गँगमन’ व भुयारी गटारांत साफसफाई करण्यासाठी उतरणाऱ्या कामगारांना कोणी वाली नाही. आजच आम्ही वाचले की, शेतमजुरांसह असंघटित कामगारांसाठी सात कल्याणकारी योजना राज्य सरकारने जाहीर केल्या. त्यात शेतमजूर, घरेलू कामगार, कचरा वेचक, वर्तमानपत्रे आणि दूध वाटणारे, अगरबत्ती आणि चपलांच्या व्यवसायातील कामगार, रंगकाम करणारे, यंत्रमाग कामगार, दुकाने आणि गोदाम हमाल, रिक्षाचालक, सुतारकाम करणाऱ्यांचा असंघटित कामगारांत समावेश केला आहे व त्यांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य, शिक्षण, घरे, अपघाती मृत्यू झाल्यास चार लाख रुपये मदत करण्याचे ठरवले आहे. हे योग्यच आहे, पण मॅनहोलमध्ये तडफडणारे कामगार त्यात आहेत काय ते सांगा. पनवेलमध्ये तीन कामगार मेले. भुयारी गटारात आणखी किती मजुरांचे बळी जाणार आहेत?

राजकारण

काँग्रेसने केवळ मतांसाठी अनुसूचित जातींचा वापर करून घेतला !

News Desk

Published

on

मुंबई | काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती. आपल्या बापाचे स्मारक उभारले मात्र त्यांनी संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यास पुढाकार घेतला नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक २०२० साली पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये भाजपच्या विजय संकल्प ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य अनेक भाजप नेते उपस्थित होते.

“भाजपने अनुसूचित जातींसाठी काम केले आहे. भाजपने आणलेल्या सौभाग्य योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज, एलईडी बल्बसह गॅस आणि शेगडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेतून लाभ झालेल्या एकूण घरांपैकी तब्बल ६० टक्के घरे ही अनुसूचित जातींमधील लोकांची होती”,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Continue Reading

राजकारण

आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत | पंतप्रधान मोदी

News Desk

Published

on

नवी दिल्ली | “विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे. विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हा एक अद्भुत संगम आहे”, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे. ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी हे दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान मोदीं महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा आणि दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

  • विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकी पूर्वीच आपल्या पराभवाचा बहाणा शोधला आहे. ते आतापासूनच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत
  • विरोधकांनी महाआघाडी केली तशी आम्ही सुद्धा केली. त्यांची महाआघाडी सर्व विरोधी पक्ष एकत्र घेऊन करण्यात आली आहे.
  • आमची महाआघाडी देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत
  • विरोधकांची महाआघाडी हे नामदारांचे बंधन आहे.
  • विरोधकांजवळ धनशक्ती असली तरी आमच्याजवळ जनशक्ती आहे
  • आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी चांगली आहे ?
  • विरोधकांच्या कालच्या महामेळ्यात अनेक जण लोकशाही वाचविण्याबाबत बोलत होते. त्यातीलच एका नेत्याने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य समोर आलेच.
Continue Reading
Advertisement

HW Marathi Facebook

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या