HW News Marathi
राजकारण

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली? मोदी सरकारची ‘एक्स्पायरी डेट’ संपल्याचे या मंडळींनी सांगितले. देवेगौडांपासून शरद पवारांपर्यंत आणि चंद्राबाबूंपासून अखिलेश यादवांपर्यंत अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही तिथे आले व बंडाची ठिणगी टाकून गेले. त्याचे पडसाद देशात उमटत आहेत. ममता बॅनर्जी यांचे आमचे व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत. प. बंगालची ही वाघीण मोदी-शहांना सळो की पळो करून सोडत आहे. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून मोदी सरकारवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

श्री. मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. कोलकाता येथे 22 पक्षांची एक महासभा झाली व त्यांनी ‘मोदी सरकार हटाव’ची गर्जना केली. 22 पक्षांचे प्रमुख नेते ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून कोलकाता येथे आले. मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही.

कोलकाता येथे 22 पक्षांची एक महासभा झाली व त्यांनी ‘मोदी सरकार हटाव’ची गर्जना केली. 22 पक्षांचे प्रमुख नेते ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून कोलकाता येथे आले. मोदी सरकारची ‘एक्स्पायरी डेट’ संपल्याचे या मंडळींनी सांगितले. देवेगौडांपासून शरद पवारांपर्यंत आणि चंद्राबाबूंपासून अखिलेश यादवांपर्यंत अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही तिथे आले व बंडाची ठिणगी टाकून गेले. त्याचे पडसाद देशात उमटत आहेत. ममता बॅनर्जी यांचे आमचे व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत. प. बंगालची ही वाघीण मोदी-शहांना सळो की पळो करून सोडत आहे. शिवसेनेनेही कोलकात्याच्या महासभेत यावे व रणशिंग फुंकावे, अशी ममतांची इच्छा होती. पण आमचे रणशिंग आम्ही आमच्याच मैदानात फुंकत असतो व ते सगळ्यात आधी फुंकले आहे. ममता यांच्या व्यासपीठावर सेक्युलरवाद्यांचा जोर होता व ती त्यांची विचारसरणी आहे. आम्ही ढोंगी सेक्युलरवादी नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोतच व राममंदिरापासून ते समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीपर्यंत आमच्या भूमिका ठाम आहेत. कोलकात्याच्या महाआघाडीस आमचा विचार झेपला नसता. अर्थात मोदी यांच्या आघाडीतही रामविलास पासवान, नितीशकुमार, रामदास आठवले वगैरे असे काही नमुने आहेत की, त्यांचाही अयोध्येत

राममंदिर उभारण्यास

समान नागरी कायद्यास विरोध आहे. तरीही आज हे लोक भाजपबरोबर नांदत असल्याने एकदम चांगले, प्रामाणिक झाले आहेत. ममता बॅनर्जींच्या व्यासपीठावर काल जे गेले ते सगळे लोकविरोधी, देशविरोधी किंवा चोर आहेत असे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बजावले आहे. विरोधकांची आघाडी पंतप्रधान मोदी यांनी इतकी मनावर घेण्याचे कारण नाही व ते सर्व एकत्र आले म्हणून त्यांची ‘लोकविरोधी’ ‘देशविरोधी’ अशी खिल्लीही उडविण्याचे कारण नाही. विरोधकांच्या महाआघाडीत असे अनेक चेहरे-मोहरे आहेत की, जे वाजपेयी व मोदींच्या राष्ट्रीय आघाडीत सामील झाले होते. स्वतः ममता बॅनर्जी वाजपेयी सरकारात मंत्री होत्या. चंद्राबाबू नायडू, डी.एम.के., फारुख अब्दुल्ला, शरद यादव, अरुण शौरी, यशवंत सिन्हा, गेगाँग अपांग हे लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येत-जात राहिलेच आहेत. खुद्द मायावती यांनी भाजपला साथ दिली आहे. हे सर्व लोक तेव्हा देशविरोधी नव्हते, पण आज देशाचे शत्रू बनले. नितीशकुमार यांनी मोदी यांची साथ सोडली तेव्हा तेसुद्धा देशविरोधी झाले व पुन्हा त्यांनी मोदींना टाळी दिली तेव्हा तेच नितीशकुमार देशप्रेमी झाले. देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीने या जुमलेबाजीतून बाहेर पडले पाहिजे. लोकशाहीत विरोधी आघाडीस महत्त्वाचे स्थान आहे व

विरोधकांचा भडीमार

पंतप्रधानांनी संयमाने सहन केला पाहिजे. मोदींचे सरकार हे काही देशाचे शत्रू नाही, पण आपले सरकार ‘अमर’ आहे या भ्रमातही त्यांनी राहू नये. निवडणुका लढवून जिंकण्याचा व सत्ता टिकविण्याचा त्यांना अधिकार आहे तसा सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करून त्यांना पराभूत करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. सर्व काही जनता ठरवते. कालच श्री. मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली? मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल. जम्मू-कश्मीरात भारतीय जनता पक्षाने लोकविरोधाची पर्वा न करता मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संधान बांधून सत्ता भोगली. सरकार त्यांनीच पाडले व मेहबुबा यांची भूमिका लोकविरोधी, देशविरोधी असल्याचा डांगोरा पिटायला सुरुवात केली. भाजप, मोदी सरकारच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवताच शिवसेनाही लोकविरोधी, देशविरोधी होऊ शकते; पण जनतेला सर्व समजते. 22 पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडविले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या तोफाही गढूळ पाण्याच्या पिचकाऱ्या सोडू लागल्या. हे चित्र लोकशाहीला बरे नाही, पण सत्ताधारी बेभान झाले की, जे घडते तेच घडताना आम्ही पाहात आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री भाषण करताना विदर्भवादींनी घातला गोंधळ; पोलिसांच्या ताब्यात

Aprna

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी | शिवाजीराव गर्जे

News Desk

मनसेचा महाआघाडीत समावेश होणार ?

Gauri Tilekar