HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

मुंबई | “शिवसेना आणि वंचितची युती तर झालेलीच आहे. त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वंचित बहुनज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीच्या औचित्यत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-वंचितच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीवर आज (23 जानेवारी) शिक्कामोर्तब झालेला आहे.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो. असे काही नाही की काल रात्री आम्हाला स्वप्न पडले की, चला आपण एकत्र येऊ या. आणि आज आम्ही एकत्र आलो. यापूर्वी सुद्धा आमच्या काही बैठका आणि चर्चा झालेल्या आहेत. काँग्रेससोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. अगदी राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आपण येण्यासाठी कोणाची जशी ना आहे. असे काही दिसलेले नाही. एक गोष्ट नक्की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांचे काही मंत्री पक्ष आहेत. मग आमचे असे ठरले की महाविकास आघाडी ज्या त्या पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाचे हित सांभाळायचे. जर आपण एकत्र आलो नाही. तर वैयक्तीक युतीला काय फायदा आहे. वैयक्तीक म्हणजे दोन पक्षाची युती केली. आणि महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा असे काही करून ठेवले. किंवा माझा देश प्रथम हा जो काही सामाहिक हेतू आहे. त्या हेतूला तडा जातो. म्हणून मला असे वाटते, शिवसेना आणि वंचितची युती तर झालेलीच आहे. त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही.”

 

‘मविआ’ने यशस्वीपणे सरकार चालविले

उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रकाशजी आपण राष्ट्रवादी किंवा शरद पवारसाहेबांन बरोबरचे संबंध सांगितले. आमचे सुद्धा तीन वर्षापूर्वीपर्यंतचे कसे संबंध होते. हे जग जाहीर आहे. परंतु, ज्या वेळेला आमच्या लक्ष्यात आले. एक फसवणुकीचे राजकारण सुरु होतोय. त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला. तसे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येतील का?, एकत्र कसे येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावर सुद्धा फार वाईट आणि विचित्र आरोप झाले. पण, त्या सगळ्या आरोपाना आणि आरोप करणाऱ्यांना आम्ही पुरुन उरलो. आणि जवळपास अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार आपण यशस्वीपणाने चालविले. मुळात हेतू चांगला असेल. तर सर्व गोष्टी पुढच्या चांगल्या होतात.

 

शिवशक्त-भीमशक्तींच्या युतीसंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले…
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यापुढे निवडणुकीमध्ये एक बदलाचे राजकारण या ठिकाणी सुरुवात करते. गेली अनेक वर्ष उपेशिताचे राजकारण यांची सुरुवात व्हावी म्हणून प्रयत्न केलेला आहे. जी चळवळ आम्ही चालवित होतो. त्याला आमच्या मित्र पक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही त्याला जूमानले नाही. आंदोलन करत राहिलो. जिंकून येणे हे मतदारांच्या हातामध्ये आहे. ते राजकीय पक्षाच्या हतामध्ये नाही. परंतु, उमेदवारी देने हे राजकीय पक्षाच्या हाता आहे. किंवा त्या उमेदवारीच्या स्वरुपामध्ये त्यांचे सामाजिकरण होईल. त्याचे सार्वत्रिक करण होईल. ही अपेक्षा मी याठिकाणी बाळगतोय.”

Related posts

नवनीत राणांची भायखळा कारागृहातून सुटका; प्रकृती खालावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल

Aprna

मनोहर पर्रीकर यांनी कधीही राफेल कराराबाबत कोणतेही वक्तव्य केले नव्हते !

News Desk

किल्लारीतील २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात

swarit