HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचा मनसेवर कार्टून वॉर | तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत

मुंबई | शिवसेना २०१९ची निवडणूक स्वबलावर लढण्याच्या घोषणा केली आहे. सेनेच्या घोषणनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. दरम्यान हे व्यंगचित्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले असून शिवसेनेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील चांगलेच झोंबल्याच दिसत आहे.

सेनेकडून राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे प्रत्युत्तर म्हणून दोन व्यंगचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एक व्यंगचित्रात राज ठाकरे हे बेडवर झोपलेले असून अहो ‘उठा आता! किती वाजलेत? तुम्ही अंथरूण सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतयेतं….! असे त्या व्यंगचित्रात दाखवन्यात आले आहे. ‘हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी काढले आहे. तर दुसऱ्या व्यंगचित्रात राज ठाकरे हे हातत लाडू घेऊन उभे आहेत. अरे, माझे सगळे लाडू गेले कुठे…?’ तिळगुळ घ्या गोड बोला! असे त्या मध्ये दाखवन्यात आले आहे. हे व्यंगचित्र नीलेश जाधव यांनी काढले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडेवर बसले असल्याचे व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार (मधील एक) सादर करीत आहे. (किती अंकी माहीत नाही) परत सांगतो, सोडून जाईन! प्रयोग १९२ (बहुदा) त्यावर मुख्यमंत्रीही मोठं गंमतीशर उत्तर देताना दाखवलेत अहो पण, आम्ही तुम्हाल धरेलय कुठे?

शिवसेने पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीत बैठकीत यापुढे आम्ही स्वबलावर लढण्याची घोषणा करुन सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा भाजपला दिला आहे. या सर्व परिस्थितीवर राज ठाकरे यांनी सेनेला व्यंगचित्रातून चिमटा काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश धनवान मात्र जनता गरीब, हेच आपल्या देशाचे खरे चित्र !

News Desk

भाजप म्हणजे खडसेंसाठी जीना यहाँ, मरना यहाँ

News Desk

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk