मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत धूसफसू आता चव्हाट्यावर आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (20 जून) बैठक बोलवली होती. यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गैरहजर होते. यानंतर एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 13 आमदार नॉट रिजेबल असल्याचे कळाले. शिवसेनेचे नॉट रिचेबल नेते गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे हे आज (21 जून) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra | After suspected cross-voting in MLC elections, CM Uddhav Thackeray has called an urgent meeting of all Shiv Sena MLAs today at 12pm. All MLAs have been strictly asked to remain present in the meeting. MVA candidate from Congress Chandrakant Handore had lost y’day.
— ANI (@ANI) June 21, 2022
एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. आता एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्यामुळे सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. गुजरातच्या हात मेरिडियन हॉटेलमध्ये स्वत: एकनाथ शिंदे मुक्कामी असून त्यांच्यासह 13 आमदार हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत काल भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस 2, शिवसेना 2 आणि काँग्रेसच्या 1 असे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचा उदेवार हा शिवसेनेची मते फुटल्यामुळे पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गुजरातमधील मेरिडियन हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.