HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाबाबत बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणा !

मुंबई | मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे विधान केले होते. मात्र, आरक्षणाबाबत केवळ बाहेर घोषणा करण्यापेक्षा त्यासाठी सभागृहात विधेयक आणावे, अशी मागणी शेकापचे आमदार गणपत आबा देशमुख यांनी केली आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ सुरु आहे.

‘सध्याच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, अशी मागणी आमदार गणपत देशमुख यांनी देखील केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करणाऱ्या धनगर समाजालाही मुख्यमंत्र्यांनी बारामतीला आल्यानंतर धनगर समाजाला देखील मराठा समाजाप्रमाणेच आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील गणपत देशमुख यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर नोटबंदीच्या निर्णयाबाबत अरविंद सुब्रमण्यम यांनी सोडले मौन

News Desk

पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, दिग्गजांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

मुख्यमंत्री पदी विराजमान होताच कमलनाथ यांच्या अडचणीत वाढ

News Desk