HW News Marathi
राजकारण

मराठ्यांसाठी शिवसेना आमदाराचा राजीनामा

औरंगाबाद | मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. औरंगाबादमधील कन्नड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभाध्यक्षांकडे ई मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे.

मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्यानंतर कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते. बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश न निघाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली होती. अखेर ही मुदत उलटून गेल्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळत आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

त्यामुळे राजकारणात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराने आपला शब्द पाळल्याचे पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही राजकारण्याने पुढाकार न घेतल्यामुळे अद्याप हे आरक्षण मिळू शकलेले नाही. त्यातच एका शिवसेना आमदाराने राजीनामा देणे हि अत्यंत महत्वाची बाब आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

News Desk

जानकर देणार पवारांना आव्हान, भाजपकडे करणार ६ जागांची मागणी

News Desk

मोदीजी, भारत हा तुमच्या वडीलांची किंवा आजोबांची जहागीर नाही !

News Desk
राजकारण

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरु | संजय राऊत

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेने देखील या बंदला पाठिंबा जाहीर दिला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रातील चित्र आहे. ते चित्र पाहता राजकीय नेतृत्वाचे हे अपयश असल्याचे ते म्हणालेत. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केली.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळले होते. तसेच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचे आणि रेल्वे अडवल्याचे पाहायला मिळाले. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Related posts

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

News Desk

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्विकारणार?

News Desk

पुण्यात शिवसैनिकांचा रास्ता रोको, इंधन दरवाढीचा निषेध 

News Desk