HW News Marathi
राजकारण

रोडरोमियो’सारखे आमच्या मागे का लागता ?

मुंबई |रोडरोमियो’सारखे आमच्या मागे का लागता ? आम्हाला तुमच्यात अजिबात रस नाही,” अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे. पुढे राऊत असे देखील म्हटले की, “आम्ही वारंवार नाही म्हणत असतानाही आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असे म्हणत आमच्या मागे रोडरोमियोसारखं मागे लागणे हा कायद्याने गुन्हा आहे. आम्हाला तुमच्यात काडीचाही रस नाही.”

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (६ जानेवारी) लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच भूमिका घेत स्वबळाचा नारा दिला आहे. लातूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोघेही म्हणाले आहेत. भाजपच्या या स्वबळाच्या नाऱ्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, ” शिवसेनेसमोर अशी भाषा कुणी करू नये. आम्ही मातीतले पैलवान आहोत. पुतळ्यांची नव्हे आम्ही विचारांची उंची वाढवतो. आम्हीही तलवारीला धार काढून बसलोय.”

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वबळाचा नारा

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लातूर दौऱ्यात शिवसेनेला चेतवले होते. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शहा यांना भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील ४८ पैकी ४० जागा जिंकू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युतीच्या संभ्रमात राहू नका, तुम्ही तयारीला लागा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार

News Desk

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

News Desk

आम्ही विराेधी पक्षात नव्हे तर सत्तेत असू !

News Desk