मुंबई | लोकसभा निवडणुकीत प्रचार ऐन रंगात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, नेता आणि उमेदवार एकमेंकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना. निवडणुकीच्या प्रचार आणि भाषणादरम्यान अनेक नेत्यांची जीभ घसरते. या नेतेमंडळीची वादग्रस्त वक्तव्य करत आणि राजकारणी त्यांच्या भाषेची मर्यादा ओलांडतात. या नेत्यांच्या यादी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान राऊत यांनी केले आहे.
#WATCH Maharashtra: Shiv Sena's Sanjay Raut speaks on Model Code of Conduct during Elections. Says, "…Hum aise log hain, bhaad mein gaya kanoon, achar sanhita bhi hum dekh lenge. Jo baat hamare mann mein hai wo agar hum mann se bahar nahi nikalein to ghutan si hoti hai" (14.04) pic.twitter.com/9B6w1yAawJ
— ANI (@ANI) April 15, 2019
राऊत यांच्या या विधानामुळे त्यांनी थेट निवडणूक आयोगाला चेतावणी दिली आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, जो बात हमारे मन मैं है, वो अगर मन से बाहर ना निकाले गए तो घुटन सी होती है’, असे विधान राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु विरोधकांडकडून कोणतीही मागणी करण्यात आली नाही. परंतु राऊत यांच्या विधाननंतर नेमके कोणते वळण घेणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.