June 26, 2019
HW Marathi
राजकारण

शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

सातारा | राष्ट्रवादीचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सातारा येथील जयवंतराव भोसले कृषी महाविद्यालय शिवनगर (ता. कराड येथे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहिले होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी हॅलीपॅडजवळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांनी हॅलीपॅडजवळ जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी शिवेंद्रसिंह यांनी मुख्यमंत्र्यांशी अन्य काही मुद्द्यांसह सातारा शहर हद्द वाढीबाबतही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, शिवेंद्रसिंह आणि फडणवीस यांच्या भेटीवरून अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Related posts

…तर जनताच बंड करील | उद्धव ठाकरे

News Desk

नरेंद्र पाटील यांच्या ‘मातोश्री’ भेटीत नेमके दडलय काय ?

News Desk

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk