HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

बाळासाहेबांच्या कलादालनावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठी बाचाबाची

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमधील वाद अत्यंत टोकाला गेल्याची घटना आज (१७ सप्टेंबर) मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये घडली आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीची बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या मुद्द्यावरून शिवसेना नगरसेवकांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कलादालनाच्या विषयाकडे महापौरांकडून वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक होत आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवीगाळ करत महापौर कार्यालय आणि स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून होत होती. मात्र, त्यांना मागणीच्या महापौरांकडून योग्य ती दखल घेतली न गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर कार्यालय, स्थायी समितीच्या सभागृहाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तर यावेळी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ आणि शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

इतकेच नव्हे तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी युतीबाबतच्या घोषणा देखील देण्यात आल्या. “राज्यात जरी भाजप-शिवसेना युती झाली तरीही मीरा-भाईंदरमध्ये युती होणार नाही”,असा इशारा देखील यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला. शिवसेना-भाजपमधील वाद इतका टोकाला गेल्याने महापौरांना स्थायी समितीची सभा अखेर तहकूब करावी लागली.

Related posts

ऍट्रोसिटी कायद्याविरुद्ध कितीही आंदोलने केली तरी त्यात बदल होणार नाही !

News Desk

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटेंनी स्थापन केला नवा पक्ष

News Desk