HW News Marathi
राजकारण

‘एनडीए’च्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही !

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत मोठा बेबनाव निर्माण झाला. इतकेच नव्हे तर जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही शिवसेना ही भाजपप्रणीत ‘एनडीए’मधून जवळपास बाहेर पडलेलीच आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता सोमवारी (१८ नोव्हेंबर) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली असून शिवसेना मात्र या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. “एनडीएच्या बैठकीला शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही”, असे स्पष्ट विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपप्रणित एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, यात एकीकडे भाजपकडून देखील शिवसेनेला आमंत्रण देण्यात न आल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नसेल असे देखील संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी समीकरणे तयार होत असताना शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, शिवसेना ही आता जवळपास ‘एनडीए’मधून बाहेर पडल्यातच जमा आहे. केवळ तशी औपचारिक घोषणा झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे ?

News Desk

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

काँग्रेसनंतर आता ‘नमो अ‍ॅप’शी संबंधित १५ पेजेसवर देखील कारवाई

News Desk