HW News Marathi
राजकारण

भाजपने ईडीची भीती दाखविल्यानेच शिवसेना युतीसाठी तयार !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीच्या निर्णयानंतर जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे. भाजपने शिवसेनेला ईडीची (अंमलबजावणी संचलनालय) भीती दाखविल्याने शिवसेनेने युती केल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा भाजप-शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ तर भाजपला २५ जागा तर विधानसभेसाठी ५०-५० जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. गेल्या ५ वर्षात भाजपसोबत असताना देखील शिवसेनेने कायमच विरोधी पक्षाची भूमिका बजावली. शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतु, अखेर आगामी निवडणुकांसाठी हे दोन्हीही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही | धनंजय मुंडे

News Desk

विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देण्यात तर मी लोकहिताचे निर्णय घेण्यात व्यस्त !

News Desk

मसूद प्रकरणी मोदींनी पाकिस्तानचे दात घशात घातले, कमाल झाली !

News Desk